Ad will apear here
Next
भाजपच्या प्रत्येक जिल्हा शाखेतर्फे दुष्काळग्रस्त भागात सेवाकार्य
पक्षाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सर्व लोकप्रतिनिधी राज्यातील दुष्काळ असलेल्या जिल्ह्यांतील चारा छावण्यांना भेट देतील आणि ‘भाजप’ची प्रत्येक जिल्हा शाखा दुष्काळग्रस्त भागात सेवाकार्य करेल, असा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘भाजप’ची बैठक २१ मे २०१९ रोजी मुंबईत झाली. बैठकीतील निर्णयांची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांना दिली. या वेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल भातखळकर उपस्थित होते.


मुनगंटीवार म्हणाले, ‘भाजपचे खासदार, आमदार, लोकसभा उमेदवार, पदाधिकारी, जिल्हाध्यक्षांची बैठक लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी झाली. राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांनी परीश्रम केले असून, जनतेचा आशीर्वाद मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे युतीला मोठे यश मिळेल असे चित्र स्पष्ट झाले. लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीत राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रामुख्याने चर्चा झाली.’

‘भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी दुष्काळी भागाला आणि चारा छावणीला भेट देतील; तसेच गावातील पाणी टंचाईचा आढावा घेतील. सरकारने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक निर्णय घेतले आहेत त्याच्या अंमलबजावणीचा आढावा लोकप्रतिनिधी घेतील व अडचणी दूर करतील. दुष्काळाचा सामना करणारे गावकरी-शेतकरी यांच्यासाठी आमदार निधीतून पैसे खर्च करता यावे अशी आमदारांनी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार विशेष बाब म्हणून एक शासन निर्णय काढण्यात येईल. या निधीतून आमदार दुष्काळग्रस्त भागात पाण्याची टाकी, चारा छावणी व टँकर इत्यादीसाठी मदत करू शकतील,’ अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.


फडणवीस व दानवे यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी भाजप पक्ष संघटनेने प्रभावी कार्य करण्याची सूचना त्यांनी केली. या प्रसंगी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार डॉ. रामदास आंबटकर व आमदार डॉ. संजय कुटे उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यांनी दुष्काळी स्थिती व त्यावर भाजप सरकारने केलेली उपाययोजना याची माहिती दिली. आशिष शेलार, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व सुजितसिंह ठाकूर यांनी विविध मतदारसंघांचा आढावा घेतला. विजयराव पुराणिक यांनी पक्षाने निवडणुकीसाठी केलेल्या संघटनात्मक कामाचा आढावा घेतला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZPJCA
 What measures are they taking to mitigate effects of the POSSIBLE
failurre of rains NEXT year . It takes time to design and activate such
measures . Now is the time to start . Preservation is better than cure .
Similar Posts
‘सदस्यता अभियानात भाजप समाजाच्या सर्व घटकांना जोडणार’ मुंबई : ‘लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा संघटनेच्या विस्तारासाठी सज्ज झाला असून, सदस्यता अभियानामार्फत भाजप समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, अल्पसंख्य, प्रगत, मागास, गरीब, श्रीमंत अशा सर्व घटकांना पक्षाबरोबर जोडून घेईल,’ असे भाजप सदस्यता अभियानाचे राष्ट्रीय
दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा मुंबई : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राज्य सरकारने चार वर्षांत यशस्वी कामगिरी केली असून, राज्याला निराशेतून बाहेर काढून प्रगतीच्या मार्गावर आणले आहे. ‘भाजप’तर्फे आपण मुख्यमंत्री फडणवीस व त्यांच्या सरकारचे अभिनंदन करतो,’ असे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी मंगळवारी (ता
‘भाजपचे डावखरे विजयी होतील’ मुंबई : ‘विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारीसाठी निरंजन डावखरे यांची केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस केली असून, ते निवडणुकीत निश्चित विजयी होतील,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. २४) व्यक्त केला, तर ‘निरंजन डावखरे यांच्या विजयामुळे कोकणात भाजपला
‘संवाद आणि सूक्ष्म नियोजनावर अधिक भर द्यावा’ मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी येणार्‍या काळात संवाद आणि सूक्ष्म नियोजनावर अधिक भर दिला पाहिजे,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language